Skip to main content
पुरंदर तालुक्यामधील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान ; वाहतूक ही पर्यायी मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 11 ते 18 जुलै या काळामध्ये वाहतुकीमध्ये बदल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आठ जुलै रोजी श्री शेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे, या दृष्टीने ग्रामीण हद्दीमधील पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त 11 ते 15 जुलै या कालावधीमध्ये राहणार आहे, पालखी मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करून ती पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेला आहे, पुणे ते सासवड सासवड मुक्काम ११ जुलै रोजी पहाटे दोन वाजल्यापासून ते 13 जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पुणे कडून सासवड कडे दिवेघाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे ,या मार्गावरील वाहन एक खडीमशीन चौक कात्रज कापूरहोळ मार्गे जातील, सासवड कडून पुणे बाजुकडे येणारी वाहतूक गराडे खेड शिवापुर मार्गे वळविण्यात येणार आहे, सासवड ते जेजुरी जेजुरी मुक्काम आणि जेजुरी ते वाल्हे वाल्हे मुक्काम 13 जुलै रोजी पहाटे दोन वाजता पासून ते 14 जुलै रोजी बारा वाजता पुणे येथून सासवड जेजुरी वाल्हे निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना झेंडेवाडी पारगाव मेमाणे सुपे मोरगाव निरा या मार्गांचा वापर करावा, वाल्हे ते लोणंद लोणंद मुक्काम १५ रोजी पहाटे दोन वाजता पासून ते १५ रोजीचे सायंकाळी पाच वाजता पर्यंत पुणे येथून सासवड जेजुरी वाल्हे निराकडे तसेच निरा इथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सासवड जेजुरी मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा लोणंद येथून पुढे फलटण मार्गे 15 ते 18 जुलै या कालावधीमध्ये फलटण लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहने शिरवळ मार्गे पुण्याकडे येतील तसेच पुणे येथून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहने शिरवळ मार्गे जातील नागरिकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डुडी यांनी केलेले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment