Skip to main content
पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्यासाठी पुरंदरची पालखी सोहळयासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; झेडेवाडी ते निरा मार्गावर विशेष आरोग्य पथके सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभाग आणि सर्वकष तयारी पूर्ण केली असून ,शनिवारी दि. 11 रविवार दि. 12 रोजी झेंडेवाडी ते निरा या मार्गावरून लाखो वारकरी मार्गक्रमण करणार असून, त्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी विशेष वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम काळे यांनी दिली .वारकऱ्यांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी पालखी मार्गावरील गावाचे कीटक शास्त्रीय सर्वेक्षक पूर्ण करण्यात आले आहे. सासवड व जेजुरी शहर असं मार्गावरील विहिरींची निर्मितीकरण करण्यात येत असून, 264 पाण्याचे नमुने आणि 29 टीसीएल नमुने तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत, संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी ही करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री केंद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी सुरू असून, झेंडेवाडी, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा येथे अतिदक्षता सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, तसेच संपूर्ण पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर आरोग्यसेवा पथके तैण्यात राहणार आहेत, झेंडेवाडी, दिवे, शिवरी, बेलसर फाटा दौंडज प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे आणि निरा येथे 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. पालखी सेवेसाठी 11 वैद्यकीय अधिकारी 25 समुदाय आरोग्य अधिकारी, 35 आरोग्य सेवक, 25 आरोग्य सेविका यांच्यासह एकूण 148 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ व डॉ. विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा वारकऱ्यांना तत्परसेवा देण्यासाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment