Skip to main content
'गुणवंताचा गौरव हाच देशाचा गौरव' म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड विद्यालयात इयत्ता 10 वी, 12 वी च्या विध्यार्थ्यांचा कौतुक समारंभ संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड म. ए. सो. वाघीरे विदयालयात इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार आणि कौतुक समारंभ अत्यंत उत्साहत पार पडला. या सोहळ्यात शाला समिती अध्यक्ष श्रीयुत मिरासदार राहुल, शाला समिती महामात्र श्रीयुत सुधीर भोसले तसेच प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी पांडुरंग बुधे, प्रॉडकशन मॅनेजर (Accurate Engingeering company, Gotemal )हे होते.कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन, आणि स्वागत गीताने झाली. या वर्षी शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100%,12 वी कला शाखा 86.66%, विज्ञान शाखा 95.23% लागून शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विध्यार्थ्यांचा सत्कार शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. आपल्या मुलांचे यश पाहुन उपस्थित पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुत कांबळे सर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विद्यालयाच्या प्रगतीची म्हणजे विद्यालयाने वर्षभरात ज्या ज्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले त्याची माहिती दिली.या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे पांडुरंग बुधे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाला माजी विद्यार्थी म्हणून बोलविणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे सांगितले. विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक कोळंबे सर यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले त्यांनी मोठी स्वप्नं पहा व ती सत्यात उतरविण्यासाठी अथक परिश्रम करा हा संदेश दिला. शाला समिती महामात्र श्रीयुत सुधीरजी भोसले यांनी सोशल मिडीयाचा योग्य कारणासाठी वापर करा व त्यातील चांगल्या गोष्टींची प्रेरणा घेऊन यश संपादन करा असे सांगितले. कार्यक्रमाचे आध्यक्ष शाला समिती आध्यक्ष राहुलजी मिरासदार यांनी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी स्मृती म्हणून जपाव्यात, नवीन क्षेत्रात ज्या ठिकाणी वाव आहे त्याची माहिती घ्यावी व त्यात यश संपादन करावे हा संदेश दिला.पाहुण्यांचा परिचय जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्रीयुत कोऱ्हाळे सर यांनी केला, या कार्यक्रमास विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्रीयुत सुरवसे सर व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका लडकत मॅडम उपस्थित होते सूत्रसंचालन विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका रिकामे मॅडम यांनी केले. आणि आभार श्रीयुत खैरनार सर यांनी मानले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment